सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत १ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रमदान!

Home

दि. ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियंत्रिकी महाविद्यालयामार्फत स्वच्छतेसाठी श्रमदान संपन्न!

‘कचरा-मुक्त भारत’ या थीमवर सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ मोहिमेसह देश सध्या स्वच्छतेचा पंधरवडा उत्सव साजरा करत आहे. एकत्रितपणे एकता आणि दृढनिश्चय दाखवून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेच्या आवाहनातून प्रेरणा घेऊन, आजपर्यंत, गेल्या १४ दिवसांत देशव्यापी मोहिमेत ३२ कोटींहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे, ज्यामध्ये दररोज सरासरी २.३ कोटी लोकांचा सहभाग आहे.
याच अनुषंगाने अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर या अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत दि. ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी अकलूज मधील शेटे वस्ती ते स्मृतिभवन दरम्यान परिसरातील स्वच्छतेसाठी श्रमदान केले. सदर अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व संबंधित व्यक्तींनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *