सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर – अकलूज मध्ये म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

Home

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर - अकलूज मध्ये म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी जगाला अहिंसा व सत्याचा संदेश देणारे म. गांधी तसेच “जय जवान, जय किसान” असा नारा देत शेतकरी व सैनिक यांचे महत्व देशाला सांगणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांना जयंती निमित्त आदरांजली वाहण्यात आली.

सदर प्रसंगी महाविद्यालयामधील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व परिसरातील लोक उपास्थित होते. प्रतिमापूजनानंतर महाविद्यालयामधील प्रथम वर्ष पदविकामधील शिवतेज माने देशमुख या विद्यार्थ्याने म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल आपले मत मांडले. सदर कार्क्रमाचे प्रास्ताविक, आभार व सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत कासे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *